गुरुवार, २१ मे, २०२०

सदा सर्वदा

सदा सर्वदा योग तूझा घडावा

तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणे हेच आता
उभा सणेला घृण चालवावे

भूदे वसंता सीसदा नमावे
सत्कर्म योगे वय घालवावे
सर्वा मुखी मंगल बोलवावे

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा,
बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे,
 नारायणायेति समर्पयामि ।।३।।

अच्युतं केशवं रामनारायणं 
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, 
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।

|| आरती तुकारामा ||

आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||

राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | 
आरती || १ ||

तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें ||
 आरती तुकारामा || २ ||

|| आरती ज्ञानराजा ||

आरती ज्ञानराजा |महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत ||मनु वेधला माझा || 
आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी |हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग |नाम ठेविले ज्ञानी || १ || 
आरती || धृ ||

कनकाचे ताट करी |उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो ||साम गायन करी || २ || 
आरती || धृ ||

प्रकट गुह्य बोले |विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी |पायी मस्तक ठेविले |
आरती ज्ञानराजा |महाकैवल्यतेजा || 
सेविती || ३ ||

|| येई हो विठ्ठले ||

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥

बुधवार, २० मे, २०२०

॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥


॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।


वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।


वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।


वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।


वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।


वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥

॥ श्री विठोबाची आरती ॥


॥ श्री विठोबाची आरती ॥

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं।
कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां।
राही रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सांवळा॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥
ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती।
चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णावा किती॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥

अभिषेकासाठी गणपत्यथर्वशीर्ष

ॐ नमस्तेगणपतये ॥ त्वमेवप्रत्यक्षंतत्त्वमसि ॥ त्वमेव केवलंकर्तासि ॥ त्वमेवकेवलंधर्तासि ॥ त्वमेवकेवलंहर्तासि ॥ त्वमेवसर्व खल्बिदंब्रह्मा...